त्याने ४ हजार महिलांसोबत ठेवले शारीरिक संबंध, त्यानंतर पत्नीने केले असे काही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुण पत्नीने एका वृद्ध व्यावसायिकाचा खून केला आहे. हि घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. त्या वृद्ध व्यक्तीचे नाव डॉन जुआन असे आहे. तर त्याने २५ वर्षीय साकी सुडो या महिलेबरोबर लग्न केले होते. डॉन जुआन हा जपानमधील एक कोट्यधीश व्यावसायिक होता.

लग्नाच्या ३ महिन्यानंतर साकी सुडोने डॉनला एक दुर्मिळ विष देऊन त्याचा खून केला. या प्रकरणाचा अजून तपास चालू होता. साकी सुडो हि डॉनच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्याच्याबरोबर होती. पण त्यावेळी तिच्या विरुद्ध पुरावे नसल्याने तिला अटक झाली नव्हती. पण आता मात्र पोलिसांना तिच्या विरोधात पुरावे सापडले असून तिला अटक करण्यात आलेली आहे.

डॉन जुआन हे जेवढे त्यांच्या प्रगतीमुळे चर्चेत असायचे तेवढेच ते त्यांच्या महिलांसोबतच्या संबंधांमुळेदेखील चर्चेत होते. डॉन यांनी आपल्या आत्मचरित्रात चार हजार महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी या महिलांवर त्यांनी लाखो रुपये उडवले आहेत. ‘मी पैसा कमावतो ते फक्त माझे शौक पूर्ण करण्यासाठी. मला महिलांसोबत फिरायचा शौक आहे त्यामुळे मी त्यांच्यावर पैसे उडवतो’, असे वक्तव्य डॉन यांनी एका मुलाखतीत केले होते.

You might also like