Friday, January 27, 2023

…आणि जयंत पाटलांना अश्रू झाले अनावर (Video)

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील गेले होते. पण, मंत्री जयंत पाटील आपला खंदा कार्यकर्ता गेल्याने चांगलेच भावूक झाले,ते ढसाढसा रडू लागले

असे कार्यकर्ते आता मिळणं अवघंड. राजाराम बापूंनंतर मी टिकलो कारण सोबत ही लोकं होती…असं म्हणताना जयंत पाटील यांच्या डोळ्यांत पाणी आले. पाटील यांना भावुक झालेले पाहून उपस्थितांमध्येही शांतता पसरली.

- Advertisement -