शरद पवार युपीए अध्यक्ष?? जयंत पाटील म्हणतात, सर्वांनी एकत्र बसून…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावे असा प्रस्ताव युवक राष्ट्रवादी राष्ट्रीय कार्यकारणीने केल्यानंतर चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता जयंत पाटील सर्वांनी एकत्र बसून यूपीएची दिशा ठरवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल की, सध्या देशातील युपीएचे अध्यक्ष सोनीया गांधी आहेत. देशातल्या सर्व पक्षांचा विचारकरून सोनिया गांधींना अध्यक्ष केलं होतं. त्यामुळं यूपीएच्या मुद्दायवर सर्वांनी एकत्रित येऊन चर्चा करणं गरजेचं आहे. तसंच, यावर चर्चा झाल्यावर भाष्य करणं योग्य आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

“काँग्रेसचं अस्तित्व देशातील राज्यांमध्ये होतं, बऱ्याच राज्यांमध्ये आजही आहे. पण असे निर्णय कोणी वक्तव्यं करुन होत नाहीत. काँग्रेस पक्ष हा देशातील एक प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासहित सर्वांना एकत्रित बसून चर्चा करत युपीएची पुढील वाटचाल ठरवण्याची आवश्यकता आहे,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.