हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापनदिन… त्यानिमित्ताने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. तसंच, एका गोष्टीबद्दल खंतही व्यक्त केली आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
जयंत पाटील म्हणाले, राजकीय परिस्थितीप्रमाणे तडजोड करणं आवश्यक असतं. २००४ मध्ये राष्ट्रवादीला ७२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली झाली असती असं आजही वाटतं”.
काँग्रेसी विचारांचं सरकार महाराष्ट्रात राहावं अशी शरद पवार साहेबांची भूमिका नेहमीच होती. त्या भूमिकेतून त्यांनी समजुतीची भूमिका घेतली होती. आजही काँग्रेसच्या तुलनेत आमचा पक्ष मोठा आहे. मोठ्या भावाच्या नात्यानं काँग्रेसला सोबत घेऊन, शिवसेनेला सोबत घेऊन पवारसाहेबांनी राज्यात जे सरकार स्थापन केलंय. ते जास्त काळ चालावं हीच आमची भूमिका आहे,’ असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.