अजित पवारांवर अन्याय झाला? जयंत पाटलांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. पवारांच्या या निर्णयानंतर अजित पवारांना कुठेतरी साईडलाईन केलं का ? अशा चर्चा रंगू लागल्यात. अजित पवारांवर अन्याय झाला का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना विचारलं असतं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाहीये आणि आम्ही एकमतानेच हे सर्व राष्ट्रीय स्तरावरील निर्णय घेतले आहेत. पक्षाच्या वाढीसाठीच हे सगळं चाललं आहे. अजित पवारांकडे विधानसभा विरोधीपक्षनेते पदाची खूप मोठी जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही घराणेशाही नाही कारण प्रफुल्ल पटेल यांनादेखील जबाबदारी देण्यात आली आहे असं जयंत पाटील यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, पवार साहेबानी भाकरी फिरवली नाही तर नव्या लोकांना जबाबदारी देण्यात आली आहे. आमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता संकटात आलेली होती. त्यामुळे या सर्वाना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन पवार साहेबांनी कामाला लावलं आहे. वेगवेगळ्या राज्याची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांना दिली आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रीय स्तरावरची पक्षाची मान्यता मिळेल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोरदार प्रयत्न करतोय असेही जयंत पाटील म्हणाले.