…तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केलं असतं; अधिवेशनाच्या सुरुवातीसच जयंत पाटलांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ‘वारंवार आम्ही विनंती करुनही राज्यपालांनी अध्यक्षपदाची निवडणूक लावली नाही. ते कशाची वाट पाहत होतो हे आमच्या लक्षात आले. हे आधीच सांगितले असते तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केले असते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. यावेळी सर्वप्रथम नरहरी झिरवळ यांनी प्रास्ताविक केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर राजन साळवींसाठी थोपटेंनी प्रस्ताव मांडला. आवाजी मतदानानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी राज्यपाल व एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. ते म्हणाले की, मला सर्वात प्रथम राज्यपालांचे आभार मानायचे आहेत. गेले अनेक महिने महाराष्ट्राच्या विधानसभेला याची प्रतिक्षा होती. वारंवार आम्ही विनंती करुनही त्यांनी निवडणूक लावली नाही. ते कशाची वाट पाहत होतो हे आमच्या लक्षात आले. राज्यपालांनी देशाला आदर्श घालून दिला आहे. आता त्यांनी १२ आमदारांची पाठवलेली यादी तात्काळ मान्य करावी.

Vidhansabha Adhiveshan Live | शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा

 

दरम्यान, सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणी सुरु असताना काही सदस्य गोंधळ घालून काही सदस्य आसन क्रमांक सांगत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. तर अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार म्हणजे आवाजी पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मतदान पार पडले आणि यावेळी राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केल्यानंतर त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मनसेचे राजू पाटील तसेच बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देखील राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले.

Leave a Comment