राज ठाकरेंनंतर ओवेसी पिक्चर मध्ये येतील अन्…; जयंत पाटलांनी सांगितला विरोधकांचा प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यातच आता राज ठाकरे पुण्यातील हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा म्हणणार आहेत. या एकूण सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनंतर ओवेसी पिक्चर मध्ये येतील आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील अस जयंत पाटील यांनी म्हंटल. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, ज्या प्रकारे महाराष्ट्रात जाणीपूर्वक जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. याचा पुढचा प्लॅन मी तुम्हाला सांगतो. आज राज ठाकरे एका बाजूने मशिदीवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा स्पिकरवर वाजवण्याचा आग्रह करणार त्यानंतर थोड्या दिवसांनी ओवैसी पिक्चरमध्ये येणार. याद्वारे राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा आणि पुढे काहीतरी अघटित घडवण्याचा प्रयत्न सुरु होणार, हे महाराष्ट्राला येत्या काळात दिसेल

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात पेट्रोल,डिझेल, सिमेंट,स्टील महागाई याबाबतची चर्चा होत नाही. पण हनुमान चालीसाची चर्चा होते. आम्हीपण हनुमान, रामाचे भक्त आहोत,पण आम्ही याच कधी प्रदर्शन करीत नाही. त्यामुळे अंत्यत जाणीवपूर्वक राजकारणासाठी देवांना वापरणे हे आम्ही कधी केलेल नाही,” असे जयंत पाटील म्हणाले.