Breaking News : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडली स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ जीप

मुंबई | रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ जीप सापडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिस याचा तपास करत आहेत.

अंबनी यांच्या मुंबई येथील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा मोठा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे.

दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. तर आज दुपारी तीन वाजता या कारसंदर्भातील फोन आल्याचं कळतं. अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. कारमध्ये जिलेटिनच्या 25 कांड्या असल्याची माहिती मिळत आहे.

You might also like