Saturday, February 4, 2023

मारहाण होत असलेल्या बॉयफ्रेन्डला वाचवायला मध्ये पडणाऱ्या गर्लफ्रेन्डचा मृत्यू

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारताला स्वातंत्र्य मिळून खूप वर्ष झाले तर काही ठिकाणी लोक अजून जुन्याच विचारांचे आहेत. आजसुद्धा अनेक ठिकाणी खोट्या सन्मानासाठी प्रेम करणाऱ्या तरूण-तरूणींची हत्या केली जाते. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना झारखंडच्या मडवा गावात घडली आहे. यामध्ये एका तरूणीच्या कुटुंबीयांनी तरूणीला आणि तिच्या प्रियकराला इतकी मारहाण केली की, यात तरूणीचा जीव गेला तर तरुणाची हालत खूप गंभीर आहे.

काय आहे प्रकरण
मृत तरुणी व तिचा प्रियकर भेटण्यासाठी गावातील एका तलावाजवळ गेले होते. तिथे तरूणीच्या कुटुंबीयांनी दोघांना एकत्र पाहिले आणि तिथेच तरूणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तरूणीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तरूणीच्या दोन भावांना हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. चतरा जिल्ह्यातील एका कुटुंबाला आपल्या मुलीने प्रेम करणं इतकं खटकलं की, त्यांनी दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये तरूणाची स्थिती गंभीर आहे. तर तरूणीने या मारहाणीत आपला जीव गमावला आहे. हे दोघे तरुण तरुणी भेटण्यासाठी गावातील एका तलावाजवळ गेले असता तिकडे तरुणीच्या कुटुंबीयांनी या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले.

- Advertisement -

यानंतर तरुणीच्या भावांनी तरूणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या प्रियकराला मारहाण होत असल्याचे पाहून ती तरुणी त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडली. या मारहाणीत तिच्या डोक्यावर काठीचा वार झाला आणि त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. तर यामध्ये त्या तरुणीचा प्रियकर अंकित कुमार गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी अंकितला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी विवेक कुमार यादव घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणात तरूणीचे भाऊ सुरज गंझु आणि जीवन गंझु यांना अटक केली आहे.