राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भरसभेत गायले ‘चिठ्ठी आयी है’ गाणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाषण म्हणजे कार्यकर्त्यासाठी मेजवानी असते. याचा प्रत्यय आज उस्मानाबादमधील सभेत आला. या सभेत अजित दादांनी (Ajit Pawar) चक्क गाणे गायले आहे. त्याचे झाले असे कि अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांना एकामागून एक चिठ्ठ्या देण्यात आल्या. त्यावेळी घे रे त्याची चिठ्ठी म्हणत अजित पवारांनी मंचावर “चिठ्ठी आई है” हे गाणं गायलं.

यावेळी कार्यकर्त्यांनीसुद्धा टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत अजित पवारांच्या गाण्याला प्रतिसाद दिला.अजित पवारांचा मूड पाहून कार्यकर्त्यांनी एकामागेएक चिठ्या देण्यास सुरुवात केली. एका कार्यकर्त्यांने तर तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा वाद हा कोर्टात चालू असून तो सुरू करा, अशी मागणी चिट्टीद्वारे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली.

या कार्यकर्त्याची मागणी बघत अजित पवार यांनी डोक्यावर हात मारून घेत अरे ते प्रकरण न्यायालयात प्रलिंबत असून ते काय माझ्या हातात आहे का? असा सवाल केला. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) कागद काढून नेत्याला देण्याची नक्कल करत अरे काही काय मागण्या करता? काय डोस्क बिस्क हाय का नाही? असे म्हणताच भर सभेत मोठा हशा पिकला.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय