हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढेल आणि तेव्हाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असतील हेच शरद पवारांच्या मनातील मुख्यमंत्री असतील असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या मनातील गोष्ट सांगितली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “2024 ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील. तसं पहायला गेलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फारसं अंतर नाहीये. पुण्यात शरद पवरांनी आपल्या मित्रांसोबत बोलताना सांगितलं… एक खाजगीतलं सांगतोय, शरद पवार म्हणाले, 2024 ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील.
शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असतो असं बाहेर पसरवलं जात आहे. मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसून शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा उध्दव ठाकरे यांना आहे. मुख्यमंत्री असलेल्या पदाला मान दिला पाहिजे. त्यामुळे ते घेतील त्या निर्णयाचे आपण स्वागत केलं पाहिजे, अशी शिकवण पवारांनी आम्हाला दिल्याचं यावेळी आव्हाड यांनी कबूल केलं आहे.