आता तरी गावस्करांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी; आव्हाडांचे ट्विट जोरदार चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बांद्र्याच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, हा भूखंड 31 वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांच्या ट्रस्टला देण्यात आला होता. परंतु दीर्घकाळ तिथे कोणतंही बांधकाम झालं नाही. त्याचमुळे म्हाडा ‘गावस्कर ट्रस्ट’ कडून तो प्लॉट परत घेऊ इच्छित होतं. पण सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेअंती आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी संबंधित प्लॉट गावस्कर ट्रस्टकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर आता तरी गावस्करांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल आहे.

गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर साठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा. असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

जर सुनिल गावस्कर नसता तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेस च्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाला. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल.

Leave a Comment