व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, (IPRCL)मुंबई येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीजीएम (ऑपरेशन्स आणि BD), जेजीएम (प्लॅनिंग आणि कॉर्पोरेट समन्वय), जेजीएम (लोको)(E-5)/डीजीएम(लोको)/ सिनीअर मॅनेजर (लोको)(E-3), जेजीएम (अकाऊंट ॲण्ड टॅक्स)/ DGM (लेखा आणि कर), सिनीअर मॅनेजर (फायनान्स ॲण्ड अकाऊंट/मॅनेजर. (वित्त आणि लेखा), सिनीअर मॅनेजर (सिव्हिल) / मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी मॅनेजर (सिव्हिल), मॅनेजर (रोपवे तज्ञ), मॅनेजर (राजभाषा), डायरेक्टर (परिवहन आणि व्यवसाय विकास) या रिक्त पदांसाठी भरती होणार असून इच्छुकांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहे. ९ सप्टेंबर २०२२ ही अर्जाची शेवटची तारीख आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, चौथा मजला, निर्माण भवन, एम.पी. रोड, माझगाव (पूर्व), मुंबई-४०००१० या पत्त्यावर पाठवायचा आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव-

1. इच्छुक उमेदवारांनी संबंधित पदांनुसार CA / ICWA / MBA / Graduation in Civil / Electrical / Mechanical पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 4. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे-

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

वरील पद भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी नोटिफिकेशन – पहा Notification

अधिकृत वेबसाईट http://www.iprcl.org/