व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहान मुलांसाठी वापरण्यात येत असलेल्या जॉन्सन बेबी पावडरबाबत एक मोठी माहिती समोर येत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषधी प्रशासन विभागाने या कंपनीचा परवाना रद्द केला आहे. कंपनीने दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या पावडरचे पीएच मूल्य अनिवार्य मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले. याचा नवजात बालकांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द केला.

जॉन्सन बेबी पावडरचे मुंबई, मुलुंड, पुणे आणि नाशिक येथून उत्पादित मालाचे सॅम्पल FDA कडे पाठवले होते. मुंबईतील औषध नियंत्रण प्रयोगशाळेतील शासकीय विश्लेषकांनी उत्पादनाच्या नुमन्यात लहान मुलांच्या त्वचेसाठीच्या निकषात पावडर अपात्र ठरवण्यात आली. लहान मुलांची त्वचा आणि संपूर्ण शरीर नाजूक असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाकडून त्वचेसाठीचे निकष ठरवून दिलेले असतात. मात्र जॉन्सन बेबीकडून या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. यामुळे नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. असे अन्न व औषध प्रशासनाने म्हंटल आहे.

त्यामुळे जॉन्सन बेबी पावडरचे उपरोक्त उत्पादन सुरू ठेवणे हे व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. त्यामुळे कंपनीच्या मुलुंड उत्पादन कारखान्याचा “जॅान्सन बेबी पावडर” या उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.