चोरलेले मोबाईल ओएलएक्सवर विकणारा अल्पवयीन चोरटा गुन्हे शाखेच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : ओएलएक्स वर चोरलेले मोबाईल विक्री करणाऱ्या 17 वर्षीय चोरट्याला गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले आहे. मात्र तो अल्पवयीन असल्याने त्याला मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दुचाकीवर शहरात फिरून मोबाईल लंपास करणे, कोणाच्याही हातातील मोबाईल हिसकावून पळून जाणे, त्यानंतर मोबाईल बंद करणे, ओएलएक्सवर अधिकृतपणे मोबाईल विक्री करणे हा सर्व प्रकार करून हा चोरटा फूस लावण्याचे काम करत होता. विशेष म्हणजे मोबाईल घेणाऱ्यांना तो बिल सुद्धा देत होता. त्याने दोन बोगस बिलबुक छापून घेतल्याचे सुद्धा समोर आले आहे. या चोरट्याला गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला मुकुंदवाडी ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

प्रेम सुभाष जाधव (17, रा. विठ्ठलनगर) हा 29 मे रोजी सकाळी पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. सुशीलादेवी शाळेसमोर जाताना दुचाकीवर आलेल्या या चोरट्याने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. अशी माहिती गुन्हे शाखे कडून मिळाली.या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून मोबाईल वापरण्याला शोधले. या गुन्ह्याचा तपास करताना मोबाईल कोणीतरी वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर मोबाइल वापरणाऱ्या चा शोध घेत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नितीन हिरे या तरुणाला त्यांनी पकडले. त्याची चौकशी केली असता त्यात त्याने ओएलएक्सवरून मोबाईल खरेदी केल्याचे सांगत पावतीही पोलिसांना दाखवली. नंतर, पोलीसांना मोबाईल विक्रेता शोधणे गरजेचे वाटले. त्यांनी ओएलएक्सवरून मोबाईल क्रमांक शोधून अल्पवयीन चोरट्याला कुरियर आल्याचे सांगून बोलवून घेत पकडले.

या अल्पवयीन चोराला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने हा मोबाईल योगेश लहाने याच्याकडुन घेतल्याचे सांगितले. परंतु फिर्यादीने अल्पवयीन चोराला ओळखले. आणि हळू हळू त्याने केलेले कारनामे समोर आलेत. शॉपी नावाचे दोन बिल बुक सुद्धा त्याच्याकडे आढळले असून यातील दहा बिले फाडलेली आढळली. त्यावरून त्याने तितके मोबाईल चोरून विक्री केल्याचा संशय शिंदे यांनी व्यक्त केला. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनं परिसरात शिवनेरी मोबाईल शॉपी होती. मात्र दोन – तीन वर्षपासून ही शॉपी बंद आहे.

Leave a Comment