Saturday, March 25, 2023

नऊवारी साडीतली ‘ती’ खास आठवण…

- Advertisement -

चंदेरी दुनिया । ऐतिहासिकपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अजय-काजोल हे ऑनस्क्रीन पती-पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका अजय साकारत असून काजोल त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत आहे.

 

- Advertisement -

या भूमिकेसाठी काजोलने बरीच मेहनत घेतली असून ती पहिल्यांदाच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपटात काजोल नऊवारी साडी, डोक्यावर पदर, नथ अशा मराठमोळा लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.

 

‘मी सात-आठ वर्षांची असताना शाळेतल्या नाटकात सहभाग घेतला होता. अभिनयाची आवड तेव्हापासूनच होती. त्या नाटकासाठी मी नऊवारी साडी पहिल्यांदा नेसली होती. त्या साडीतला फोटो माझ्याकडे आणि आईकडेसुद्धा आहे. नऊवारी साडीतली माझी सर्वांत खास आठवण माझ्या लग्नातली आहे.

 

 

माझ्या लग्नातल्या फोटोंमध्ये तुम्ही मला मराठमोळ्या लूकमध्ये पाहिला असाल. ती आठवण माझ्यासाठी खूप खास आहे’, असं काजोलने सांगितलं.