नवी मुंबईत भाजपाला धक्का ‘या’ बड्या नेत्याचा ‘मनसे’त प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन : नवी मुंबई भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडझड पाहावयास मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अशातच राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नवी मुंबई भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला आहे. आगामी नवीमुंबई निवडणुकीत नितीन काळे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

नितीन काळे यांनी भाजपचा हात सोडून मनसेचे इंजिन चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काळे यांच्यामुळे कळंबोलीत मनसेला अधिक ताकद मिळणार आहे. राज ठाकरे यांनी नितीन काळे यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरं महत्त्वपूर्ण मानली जातात.

दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातही काही महिन्यांपूर्वी शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचं पाहायला मिळालं होतं. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला. तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला होता. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता.

 

Leave a Comment