काळोशीत हायव्होल्टेजचा धमाका; 30 ते 35 टिव्ही उपकरणे जळाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा तालुक्यातील परळी भागातील काळोशी येथे अचानक व्होल्टेज वाढल्याने जवळपास 35 टिव्ही जळाले तर काहींचे घरातील मीटर जळाल्याची घटना नुकतीच घडली. महावितरण कंपनीकडून केल्या जात असलेल्या अशा प्रकारच्या अनागोंदी कारभारामुळे सामान्य नागरिकांना मात्र मोठा फटका बसला आहे. या झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात आलेली आहे.

याबाबत माहिती अशी कि, परळी भागातील काळोशी येथे अचानक विदूतवाहिनीवरील व्होल्टेज वाढल्याने घरातील जवळपास 35 टिव्हीमधील व्होल्टेजमध्ये अचानक वाढ झाली. या अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे गावातील जवळपास 30 ते 35 विदुत उपकरणामध्ये टीव्ही संच जळाले. अचानकपणे घडलेल्या या घटनेची माहिती ग्रामस्थांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांना दिली. ग्रामस्थानी माहिती दिल्यानंतर मोहिते यांनी काळोशी येथे जाऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

गेली दोन महिने झाले परळी भागातील काळोशी येथे अचानक व्होल्टेज कमी जास्त होत असल्यामुळे याबाबत स्थानिक ग्रामस्थानी महावितरणकडे अनेकवेळा तरारही केली आहे. तक्रार करून देखील संबंधित अधिकाऱ्याकडून जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असून कोरोना सारख्या महामारीत लोकांना मोठा फटका बसला आहे. महावितरणची चुक असल्याने येथील रहिवाशाना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा महावितरणच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.

Leave a Comment