Sunday, April 2, 2023

‘कमल हासन’ चौकशीसाठी चेन्नई पोलिसांसमोर हजर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारतीय स्टार कमल हासन हे ‘इंडियन -२’ चित्रपटाच्या अपघातासंदर्भात चौकशीसाठी चेन्नईचे पोलिस आयुक्त यांच्याकडे 03 मार्च रोजी हजर झाले आहेत. १ फेब्रुवारीला ‘इंडियन -२’ चित्रपटाच्या सेटवर क्रेन कोसळल्याने जवळपास तीन जणांचा मृत्यू आणि दहा जण जखमी झाले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली होती. या अपघातात मधु, दिग्दर्शक शंकर यांचे वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक संचालक कृष्णा आणि एक कर्मचारी चंद्रन यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या अपघाताच्या चौकशीसाठी ते चेन्नई पोलिसांसमोर हजर झाले आहेत.

या अपघातानंतर कमल हासन यांनी ट्विट केले होते, कि ‘मी खूप हदसे पाहिले पण आज जो हदसा झाला तो सर्वात खतरनाक होता. मी आपल्या तीन सहकार्यांना मुकलो आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा त्रास माझ्या वेदनांपेक्षा अधिक आहे. हा हादसा का झाला त्याचा शोध चालू असल्याचं कमल हसन यांनी सांगितलं होत. ‘इंडियन -२’ मध्ये कमल हासन आणि काजल अग्रवाल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

- Advertisement -

हा चित्रपट हिट चित्रपट ‘इंडियन’ चा सीक्वल आहे. ‘इंडियान 2’ भ्रष्टाचारावर आधारित चित्रपट आहे आणि भ्रष्टाचाराशी लढताना दाखवलं आहे. या . चित्रपटात म्यूजिक अणुधव सूर्यचंद्र देणार आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.