IPL 2023 : गुजरातला मोठा झटका; केन विल्यमसन IPL मधून OUT?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून सुद्धा गुजरात टायटन्सला मोठा झटका बसू शकतो. कारण काल क्षेत्ररक्षणाच्या वेळी जबर दुखापतग्रस्त झालेला स्टार फलंदाज केन विलियम्सन संपूर्ण आयपीएल मधून बाहेर जाऊ शकतो. तस झाल्यास गुजरातच्या संघासाठी मोठा धक्का असेल. कारण विलियम्सन हा अनुभवी खेळाडू आहे.

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात जोशुआ लिटलच्या 13 व्या षटकात ऋतुराज गायकवाडने चेंडू उंच हवेत मारला, त्यावेळी सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या केन विल्यमसनने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत चेंडू पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण या प्रयत्नात त्याच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली. तो तसाच खाली पडला. त्यांनंतरच्या त्याच्या बदली साई सुदर्शनला इम्पॅक्ट प्लेयर मधून मैदानात उतरला.

उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. परंतु त्यापूर्वीच अनेक मीडिया रिपोर्ट्स मधून असा दावा करण्यात येत आहे की, केन विल्यमसन आता संपूर्ण स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. आयपीएल 2023 मधून विल्यमसन बाहेर पडल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. तथापि, या संदर्भात आयपीएल किंवा फ्रेंचायझी गुजरात टायटन्सची अधिकृत घोषणा अद्याप प्रतीक्षेत आहे. मात्र जर खरच केन विल्यमसन आयपीएल मधून बाहेर पडला तर गुजरातसाठी हा मोठा धक्का असेल हे मात्र नक्की…