केंद्रीय गृहमंत्रालयाने Y दर्जाची सुरक्षा देताचं कंगनाने मानले अमित शहांचे आभार, म्हणाली..

नवी दिल्ली । मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक वादावादी सुरु आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या कंगनावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.

त्यानंतर मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार कोणाच्या बापात हिम्मत असेल तर अडवा असे खुले आव्हान तिने शिवसेनेला दिले. त्यानंतर केंद्र सरकारने कंगनाला Y दर्जाची सुरक्षा पुरवणार असल्याचे सांगितले. यावर कंगनाने ट्विटरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले. “आता देशभक्तीचा कुठलाही आवाज फॅसिस्ट दडपू शकत नाही. मी अमित शाहंची आभारी आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अमित शाह मला काही दिवसांनी मुंबईला जाण्याचा सल्ला देऊ शकत होते. पण त्यांनी भारताच्या एका मुलीला दिलेल्या वचनाचा मान राखला” असे कंगनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिने आपल्या राज्यात निघून जावे, असा इशारा शिवसेना, मनसेने दिला होता. तर, कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे मत खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते. तसेच भाजपनेही कंगनाला पाठिंबा देण्याबाबत यू टर्न घेतला होता. तसेच सिनेक्षेत्रातील मंडळींनीही कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्राबद्द कृतज्ञता बाळगण्याचा सल्ला दिला होता. अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता ‘मुंबई मेरी जान’ म्हणत कंगनाला अप्रत्यक्ष टोकले होते.

याशिवाय, ‘जर त्या मुलीनं (कंगनानं) महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार केला जाईल. तिनं मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं, अहमदाबादविषयी असंच बरळण्याचं धाडस तिच्यात आहे का?’ असे राऊत म्हणाले. मुंबईसाठी आक्षेपार्ह वक्तव्य करणारी कंगना, गुजरात या पंतप्रधानांच्या राज्यातील अहमदाबादबाबत असं वेडवाकडं बोलण्याची हिंमत दाखवणार का, असा सवाल करत राऊत यांनी तिच्यावर तोफ डागली. तेव्हा आता कंगना यावर नेमकी काही प्रतिक्रिया देणार की, सबंध महाराष्ट्राचीच माफी मागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like