Wednesday, June 7, 2023

महाराष्ट्र प्रेमाचं सर्टिफिकेट देणारे तुम्ही कोण?? कंगनाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. आता तर तिने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे कर्तृत्त्व नव्हे, अशा शब्दांत अभिनेत्री कंगना राणौतने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर शिवसेनेकडून कंगनावर टीकेचा भडिमार सुरु आहे. मात्र, कंगना राणौतही तितक्याच इर्ष्येने या टीकेला प्रत्युत्तर देत आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना शिवसेना नेते संजय राऊत यांना लक्ष्य करत होती. मात्र, आता तिने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

कंगनाने शुक्रवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एका महान पित्याचा मुलगा असणे, हे काही कर्तृत्त्व असून शकत नाही. मला महाराष्ट्रप्रेमाचे प्रमाणपण द्यायला तुम्ही कोण लागून गेलात? तुम्ही महाराष्ट्रावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करता, हे कोणी ठरवले? मला मुंबईत येण्याचा हक्क नाही, हे कोणी सांगितले, असे सवाल कंगनाने उपस्थित केले आहेत. तसेच या ट्विटसोबत कंगनाने #ShameOnMahaGovt असा हॅशटॅगही वापरला आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणखीनच आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

https://twitter.com/KanganaTeam/status/1301880314155864065?s=20