कन्नड तालुक्यात तरुणीचा मृतदेह आढळला, बलात्कार करून खून केल्याचा संशय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असणाऱ्या आठेगाव येथे १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवारातील शेतात आढळून आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीचा खून करण्यात आला, की बलात्कार करून तिला मारण्यात आले, हे अजून स्पष्ट झालं नाही.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, चापानेर येथे राहणाऱ्या रवी रामलाल राव याला पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याने मृत तरुणीस चापानेर शिवारातील गट क्र.१०८ मधील संतोष बोरसे यांच्या शेतात नेऊन अतिप्रसंग केल्याचा संशय आहे. शुक्रवारी (ता.२९) रात्री ८ वाजले, तरी तरुणी घरी न आल्याने आई, वडील व नातेवाईकानी शोधाशोध सुरू केली. मात्र तरुणी सापडली नाही. म्हणून रवी राव याच्यावर घराच्यांना संशय आला.

आरोपी हा गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून चापानेर परिसरात घरातील फरशी बसविण्याची मिस्तरी कामे करतो. त्यास विचारपूस केली, मात्र काहीच माहिती नसल्याचे त्याने सांगितले. यामुळे मुलगी बेपत्ता आसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी संशयित अरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली, तरी आरोपीने कबुली दिली नाही. म्हणून रात्री साडे अकरा वाजता कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवासे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, बीट जमादार मनोज घोडके यांनी आठेगाव ते चापानेर परिसर पिंजून काढला. यावेळी चापानेर शिवारात तरुणीचा मृतदेह आढळून आला. तरुणीचे प्रेत रात्रीच शवविच्छेदनासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. पुढील पोलीस गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहेत.

Leave a Comment