पुणे प्रतिनिधी । सतीश उगले
पुण्यात ‘लोकशाही उत्सव 2020’ सुरू आहे. या उत्सवात आज राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले सभागृहामध्ये NRC CAA आणि NPR ला विरोध का ? या विषयावर जाहीर सभा पार पडली. कन्नन गोपीनाथन हे मुख्य वक्ते तसेच तिस्ता सेटलवाड सभेच्या अध्यक्ष होत्या. आपल्या भाषणात गोपीनाथन यांनी CAA व NRC च्या सोबत अनेक सरकारी धोरणांवर टीका केली. सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे त्यांचे निर्णय मजबूत आहे किंवा नाही हे तपासणे आहे असं सांगितलं. सध्याचं सरकार नागरिकांच्या प्रश्नाला उत्तरं न देता नागरिकांनाच उलट प्रश्न करत आहे. गोपीनाथन यांनी आपल्या भाषणात काश्मीर मधील कलम 370 हटविणे, नोटबंदी अशा मोदी सरकारच्या अनेक निर्णयांवर गोपीनाथन यांनी टीका केली. सरकार कुठल्याही प्रकारे मागचा पुढचा विचार न करता निर्णय घेत आहे असंही गोपीनाथन यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
गोपीनाथन यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
– लोकशाही मध्ये चाणक्याची गरज नसते.
– संविधानाच्या मूल्यांवर आणि व्यवस्थेवर विश्वास असायला हवा. तेव्हा प्रश्न विचारता येतात.
– या सरकारच्या काळात आपलं मत मांडणारे सरकारच्या हितचिंतकाना घाबरतात.
– नागरिकांच काम हे सरकारला प्रश्न विचारणं, आता सरकार नागरिकांना प्रश्न विचारून समस्येत टाकत आहे.
तिस्ता सेटलवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आसाम मधील NRC कशाप्रकारे राबवली गेली तसेच NRC व NPR राबवणं बहुसंख्य लोकसंख्याच्या विरोधात कसं आहे हे समजावून सांगितलं.
या कार्यक्रमात ‘हम भारत के लोक’ सहआयोजक आहे. ‘लोकशाही उत्सव 2020’ प्रजसत्ताकदिना पासून म्हणजे 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत चालणार आहे. या दिवसात पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वक्ते व विषयांचे नियोजन केले आहे. या उत्सवाच्या आयोजनात अक्षरस्पर्श, एस एम जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन, कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत, राष्ट्र सेवा दल सारख्या अनेक पुरोगामी संघटना व चळवळींत काम करणारे कार्यकर्ते सहभागी आहेत.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा
हे पण वाचा-
आमिरसाठी अक्षयने आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढं ढकलली
धनंजय मुंडे ठरले ‘त्या’ अंधांसाठी ‘नगद नारायण’ ; घोषणेनंतर 48 तासांत थेट मदत