कराड नगरपालिका सभा : नगराध्यांक्षाच्या मानधनावरून सत्ताधारी- विरोधकांच्यात जोरदार खंडाजंगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड पालिकेची 15 मे 2020 मध्ये झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत प्रत्यक्ष उपसुचना व इतिवृत्तातील नोंदीतील बदल झाला आहे. त्यावरून लोकशाही व जनशक्ती आघाडीतील नगरसवेकांनी आजच्या सभेत आक्रमक भूमिका घेतली. नगराध्यक्षांसहीत नगरसवेकांचे मानधन कोविडसाठी वर्ग करण्याचा उपसूचनेची इतिवृत्तात नोंद होताना काही शब्द वगळले आहेत. ती नोंद जनशक्ती व लोकशाही आघाडीने आज फेटाळून उपसूचना जशीच्या तसीच इतिवत्तात नोंदविण्याची भूमिका घेतली. त्यावरून सत्ताधारी- विरोधकात जोरदार खंडाजंगी उडाली.

पालिकेची मासिक सर्वसाधारण सभा तब्बल दिड वर्षाने आज पार पडली. अवघ्या 27 विषयांच्या मंजुरीसाठी तब्बल आठ तास सुरू होती. दिड वर्षापूर्वी झालेल्या सभेत नगराध्यक्षांसहीत नगरसवेकांचे मानधन, बैठकीचे भत्ते कोविडला वर्ग करण्याचा विषय झाला होता. त्यावरून जनशक्ती, लोकशाही आघाडीसह व भाजपच्या नगरसेवकात सभेत हमरीतुमरी झाली. पूर्वीच्या मांडलेल्या उपसूचनेतील शब्द वगळून त्याची इतिवृत्तात नोंद केली आहे, असा आक्षेप जनशक्ती व लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी घेतला.

लोकशाहीचे सौरभ पाटील यांनी बैठकीतील उपसूचनेची व्हीडीओ क्लीप दाखवली. उपसूचनेतील शब्द व इतिवृत्तातील नोद होताना ते शब्द वगळल्याचे गटनेते राजेंद्र यादव, सौरभ पाटील, सौ. स्मिता हुलवान यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर विजय वाटेगावकर, हणमंत पवार यांनी प्रशासनासहीत नगराध्यक्षांना धारेवर धरले. मानधन वर्ग करण्याचा उपसूचनेतील शब्द वगळून झालेले इतिवृत्तच जनशक्ती, लोकशाहीने आज फेटाळले. तशी नोंद घेण्याचे गटनेते यादव यांना प्रशासनाला सांगितले. त्यावरून नगराध्यक्षा शिंदे, विनायक पावसकर, फारूक पटवेकर यांनाही वाद घातला.

मानधन माझे, निर्णय घेणारे तुम्ही कोण असा प्रतीप्रश्न करत नगराध्यक्षाही हमरीतुमरीवर आल्या. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी उपसूचनेनुसार इतिवृत्तात नोंद अपेक्षीत आहे. ती झाली नसेल तर घ्यावी, तसा ठराव असेल तर मानधनही जमा करावे लागले, त्याची वसुलीही लागू शकते, असा खुलासा केला. त्यानंतरही तासभर त्याच विषयावर खडाजंगी सुरू होती.

उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्यावरही आरोप

लोकशाही आघाडीचे गटनेते साैरभ पाटील यांनी उपाध्यक्ष जयवंत पाटील यांना आज टार्गेट केले. उपाध्यक्षांची केबिन केवळ राजकारण करण्यासाठी नाही, असा आरोप करून पाटील यांनी उपाध्यक्षांवर तोफ डागली. श्री. पाटील म्हणाले, नगराध्यक्षा शिंदे यांच्या अनुउपस्थीत सभा पुढे न ढकलता ती त्याचे अध्यक्षपद उपाध्यक्षांनी स्विकारून ती त्यांनी घेणे अपेक्षीत आहे, मात्र तसे झाले नाही. उपाध्यक्ष कधी पुढाकार घेत नाहीत. मात्र दुसऱ्याला पुढे करून राजकारण करण्यात ते सरस आहेत. गटनेते पाटील यांच्या प्रश्नावर उपाध्यक्ष पाटील यांनी त्या दिवशीही मीही बाहेर होतो. असा खुलासा केला.

Leave a Comment