Monday, February 6, 2023

कराडचा डंका : माझी वसुंधरा अभियानातही दुसरा क्रमांक

- Advertisement -

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी।

माझी वसुंधरा’ अभियान स्पर्धेत कराड नगरपरिषदेचा दुसरा क्रमांक आला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचत्य साधून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास, महसूल, ग्रामविकास, पर्यावरण मंत्री यांच्या उपस्थित ऑनलाईन सन्मान सोहळा पार पडला.

- Advertisement -

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ 2 ऑक्टोंबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रामध्ये राबविण्यात आले असून सदर अभियानात नगरपरिषदांच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी कराड नगरपरिषदेची दुसरा क्रमांक मिळाला आहे.यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे राजेंद्रसिंह यादव, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, विनायक पावसकर, मुख्य अधिकारी रमाकांत डाके आदी ऑनलाईन उपस्थित होते.

गत आठवड्यात चांगले काम करणाऱ्या राज्यातील पहिल्या 10 नगरपरिषदांच्या यादीत कराड नगरपरीषदेची निवड झाली होती.त्यानंतर नगरपरिषदेने केलेल्या उपक्रमांचे ऑनलाईन सादरीकरण ही केले होते. ऑनलाईन सादरीकरणा नंतर सबंधित विभागाने अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. कराड वासियांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे.