Friday, June 9, 2023

कराडला महसूल विभागाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद : तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी केले रक्तदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

स्वातंत्र्य व महसूल दिनानिमित्त कराड तालुक्यातील महसूल अधिकारी कर्मचारी यांनी कराड तहसिल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कराडचे तहसिलदार अमरदिप वाकडे यांचेसह महसुल कर्मचाऱ्यांनी शिबीरात रक्तदान करुन आपले योगदान दिले. या शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, प्रातांधिकारी उत्तम दिघे, अशोकराव पाटील, नायब तहसिलदार राजेंद्र तांबे, तालुका कृषी अधिकारी डाॅ. मुल्ला, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. शहाजी शेळके, डाॅ. जाधव, कृष्णा दिक्षित, सविता भाट, कुमुदिनी दळवी, महेश शिंदे, श्रीकांत माळवदे, प्रथमेश चव्हाण, जगन्नाथ साठे, अक्षय गुरव यांच्यासह मंडलधिकारी व तलाठी उपस्थित होते.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, रक्ताचा तुटवडा जाणवत असताना महसूल विभागाने केलेले रक्तदान शिबिराचे आयोजन कौतुकास्पद आहे. कोरोना काळात, पूराच्या काळात पुढाकार घेवून महसूल विभागाने काम केले. लोकांच्या हितासाठी या विभागाने नेहमीच काम केले आहे. या विभागाने रक्तदान शिबिर राबवून लोकांच्यापुढे एक आदर्श ठेवला आहे.