कराड- सातारा बाजारभाव : शेवगा, भेंडीला चांगला दर

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत शेवगा व भेंडीला चांगला दर मिळाला आहे. कराड बाजार समितीत मंगळवार दि. 30 रोजी शेवग्याची आवक 4 पोती झाली असून 10 किलोचा दर 300 ते 400 रूपये होता. तर भेंडी 170 पोती आवक असून दर तेजीत असला तरी 650 ते 700 रूपये 10 किलोचा दर होता. वाटाण्याची आवक कमी झाली असून दरही घसरू लागला आहे.