Wednesday, February 1, 2023

वीकेंड लाँकडाऊनमध्येही कराडला दुकाने सुरू; 13 दुकानांवर कारवाई

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड नगरपालिका आरोग्य विभाग व शहर पोलीसांच्यावतीने आज सलग दुसऱ्या दिवशी रविवारी कराड शहरात विविध ठिकाणी सूरू असणाऱ्या दुकानांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. विकेंड लाॅकडाऊन असतानाही काल व आज काही दुकाने सुरू होती. या पार्श्वभूमीवर कालपासून पालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. सुमारे 13 दुकानांवर कारवाई केल्यानंतर आज पुन्हा अनेक दुकानांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

कराड येथील कृष्णा नाका परिसरात जुन्या कृष्णा पूलानजीक सुरू असलेल्या मटन शॉपवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दूकानात आलेल्या ग्राहकांच्या काही दुचाकीही वाहतूक शाखेने ताब्यात घेतले. तसेच मंगळवार पेठेत काही कपड्यांची दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई करीत तीन हजार रुपये दंड करण्यात आला.

रविवारी केलेल्या कारवाईत कराड शहरातील दूकानदार तानाजी भंडारी, वाहीद मटन शॉप, इकबाल कुरेशी, गनराज पवार, प्रिया हॉटेल, राजस्थान होजिअरी या दूकांनावर दंडात्मक कारवाई करीत सोळा हजार पाचशे रूपयांची दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत पोलीस उपनिरिक्षक कांबळे, नगर पालिका आरोग्य कर्मचारी सोनू चव्हाण, सागर सातपुते यांनीही सहभाग घेतला.