कराडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विक्रीवर छापा : दोघे ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

अवैध मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत वारंवार कारवाई करणेत येत असतात. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा वैभव वैद्य यांचे आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड विभाग कराड यांच्या पथकाने मलकापुर व कोळे (ता. कराड, जि.सातारा) या गावच्या हददीत छापे मारुन अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.

राज्य उत्पादन विभाग कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबुब शहाबुददीन मुलाणी (रा. कार्वे नाका, कराड), अक्षय सुनिल कोतमीरे (रा. मंगळवार पेठ कराड ता.कराड) याचेवर मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये दुचाकी हिरो डयुएट क्र. (MH- 50/टी- 7203) तसेच एक चारचाकी मारूती 8०० क्र.(MH- 06 /ए एन- 4784) ही वाहने जप्त केली आहेत. सदर वाहनांमध्ये देशी दारु संत्रच्या 180 मि.ली. क्षमतेच्या एकुण 744 बाटल्या मिळून आल्या असून वाहनांसह एकुण रुपये 2 लाख 42 हजार 80/- किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाचे निरीक्षक संजय साळवे, दुय्यम निरीक्षक शरद नरळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव, जवान विनोद बनसोडे, भिमराव माळी, सचिन जाधव यांनी केली आहे.

Leave a Comment