व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड तालुक्यातील अनुष्का चव्हाणची आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉल स्पर्धेसाठी निवड

कराड | साजूर गावची सुकन्या कु. अनुष्का अंकुश चव्हाण हिने थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉल स्पर्धेत यश संपादन केले. अनुष्का हिची ग्रीस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनुष्काची निवड झाल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थ साजूर यांचे वतीने सत्कार करण्यात आला. विधानपरिषदेचे माजी आमदार आंनदराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास सरपंच करीष्मा कुभांर, उपसरपंच संदीप पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण, एकनाथ मुळगांवकर, राजाराम चव्हाण, अरूण चव्हाण, सुभाष चव्हाण, सुजाता चव्हाण, बलराज चव्हाण, विकास काबंळे, प्रा. सागर चव्हाण आदी उपस्थित होते.

माजी आ. आनंदराव पाटील म्हणाले, प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात चमकदार कामगिरी केल्यास यश निश्चित मिळते. अनुष्काची तिच्या मेहनतीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे. एका छोट्याशा गावातून मिळालेले यश निश्चितच गावासाठी, तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातून आज खेळाडू निर्माण होत आहेत, मात्र त्यांची संख्या खूपच कमी आहे. तेव्हा अभ्यासासोबत खेळातील संधी शोधण्याची गरज पालक व विद्यार्थ्यांवर आहे.