व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराडला शनिवारी लायन्स इंटरनॅशनलची विभागीय परिषद

कराड | लायन्स इंटरनॅशनल 3234 – डी. 1 रिजन 2 या सेवाभावी संस्थेची ‘यशवंत’ ही विभागीय परिषद येत्या शनिवारी 24 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता हॉटेल पंकज येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती या रिजन चेअरमन लायन डॉ. महेश खुस्पे यांनी दिली आहे.

यशवंत या विभागीय परिषदेचे कॉन्फरन्स चेअरमन सतीश पाटील म्हणाले, याप्रसंगी लायन इंटरनॅशनलचे प्रांतपाल राजशेखर कापसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर प्रथम उपप्रांतपाल भोजराज निंबाळकर, द्वितीय प्रांतपाल एम. के. पाटील यांचीही उपस्थिती राहील. सातारा, कराड, फलटण, बारामती या ठिकाणाहून विविध लायन्स क्लब येणार आहेत. यावेळी प्रत्येक क्लब केलेल्या कार्याची माहिती सादर करणार आहे. तसेच यापुढील काळात काय सेवा कार्य लायन्स च्या माध्यमातून करता येईल याबाबत चर्चा सत्र होणार आहे.

सातारा रिजनचे चेअरमन महेश खुस्पे सर्व क्लबच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या वेळेस विविध बॅनर सादरीकरणाचा कार्यक्रम होणार असून विविध लायन्स क्लब राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत बॅनर सादर करणार आहेत. लायन्स क्लब बारामती, लायन्स क्लब कराड सिटी, लायन्स क्लब कराड, लायन्स क्लब सातारा जनसेवा, लायन्स क्लब सातारा अजिंक्य, लायन्स क्लब सातारा कॅम्प, लायन्स क्लब सातारा एमआयडीसी, लायन्स क्लब सातारा गेंडामाळ, लायन्स क्लब सातारा सह्याद्री, लायन्स क्लब सातारा युनाइटेड, लायन्स क्लब फलटण, लायन्स क्लब फलटण गोल्डन, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम या क्लबचे विविध प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

रिजन सेक्रेटरी नईम कागदी म्हणाले, या कार्यक्रमात सेवा कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या क्लबचा व विविध पदाधिकाऱ्यांचा गुणगौरव प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी जेष्ठ साहित्यिक व नामवंत चित्रपट निर्माते व माजी आमदार रामदास फुटाणे मार्गदर्शन करणार आहेत. विविध झोनचे झोन चेअरमन उपस्थित असणार आहेत. त्यामध्ये जान्हवी पुरोहित, प्रमोद जगताप, मोहन पुरोहित , दिलीप वहाळकर हे असणार आहेत .