कराडला सख्या बहिणीकडून बहिणीचा खून

कराड | येथील वाखाण भागातील विवाहीता उज्वला ठाणेकरच्या खून प्रकरणी पोलिसंनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितामध्ये तिच्या सख्या बहिणीसह तिच्या प्रियकराला खून केल्याबद्दल आज सकाळी अटक केली. ज्योती सचिन निगडे (वय -27, बैलबाजार रस्ता, मलकापूर) व सागर अरुण पवार (26, रा. साईनगर, मलकापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना 4 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

ज्योतीचा नवरा व उज्वलाच्या खूनातील फिर्यादी सचिन सोबतच्या उज्वलाच्या अनैतिक संबधाच्या रागातून ज्योतीने प्रियकरासोबत तिचा काटा काढल्याची कबुली पोलिसांजवळ दिली आहे. उज्वला राहत असलेल्या मागील बाजूच्या शेतातून दोघेजण तिच्या घरी आले. तिचा निर्घृणपणे खून करून त्याच रस्त्याने नदीच्या कडेने ते पसार झाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

उज्वला ठाणेकरांच्या खून प्रकरणात शहर पोलिस व सातारच्या एलसीबीच्या पथकाने 24 तासात खूनाचा छडा लावला. सौ. उज्वलाचा गळा चिरून निर्घृण खून झाला होता. त्या प्रकरणात तीच्याच सख्या बहिण ज्योती हिच्या भोवती संशयाचे वलय होते. त्यानुसार काल रात्री तिला तिचा प्रियकर सागर पवारसहीत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, काल रात्री उशिरा त्यांनी खूनाची कबुली देत कारण स्पष्ट केले. ज्योेती व सागरला न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे. उज्वलाच्या घरात शेतातील रस्त्याने दोघेही शिरले. तेथे सचिनसोबत असलेल्या संबधावरून त्यांच्या वाद झाला. त्यावरून चिडून त्या दोघांनीही उज्वालाला मारहाण करत तिचा धारदार शस्त्राने गला चिरून खून केला. त्यांच्यात बराच काळ झटापट सुरू होती. त्यात उज्वलाच्या हातात ज्येतीच्या केसांचा पुंजलाकही आढळून आला आहे. उज्वलाच्या हातात केस सापडल्याने पोलिसांचा ज्योती भोवती संशय बळावला.

एलसबीने रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तपास सुरू केला. बराच काळ दोघांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अखेर त्यांनी खूनाची कबुली उशिरा दिली. त्यानुसार दोघानाही खून प्रकरणात अटक केली आहे. ज्योती व सागर यांनी धारदार शस्त्राने उज्वलाचा गळा चिरताना झटापट झाल्याने साऱ्या घरात रक्त पसरल्याची कबुली दोघांनी दिली आहे. उज्वलाचे मेव्हेण व ज्योतीचा पती सचिन निगडे फिर्याद आहेत. निगडेचे उज्वलासी असलेल्या संबधावरून ज्योतीही निगडेला सोडून बाजूला राहते आहे. पोलिसाची तपासाची चक्रे फिरल्यानंतर ती माहिती समोर आली.

त्यानुसार एलसीबीने उज्वलाची बहिण ज्योतीला रात्री ताब्यात घेतल्यानंतर पुढे उलगडा झाला आहे. त्यात सागर पवार हा तीचा प्रियकरही त्यात सहभागी आहे, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.