कराडचा जवान पंजाबमध्ये शहीद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

कराड तालुकयातील पाचुंद येथील जवान विठ्ठल महादेव जाधव (वय २६) पंजाब येथील फिरोजपूर सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. विठ्ठल जाधव २०१५मध्ये बीएसएफमध्ये भरती झाले होते. राजस्थान येथे त्यांचे पहिले पोस्टिंग झाले होते. तिथे त्यांनी दोन वर्षे सेवा बजावल्या नंतर त्यांची पंजाब येथे बदली झाली होती. गेली दोन वर्षे ते पंजाब येथे कर्तव्य बजावत होते.
१८ एप्रिल रोजी त्यांचा विवाह झाला होता. सुखी संसाराची स्वप्न पहात असताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला. लग्न कार्यासाठी एक महिना सुट्टीवर ते गावी आले होते.लग्नाला एक महिना पूर्ण झाला त्याच दिवशी ते सेवेत रुजू होण्यासाठी पाचुंदहून रवाना झाले होते. २२ मे रोजी ते सेवेत रुजू झाले. गुरुवारी २३ मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास पंजाब बॉर्डरवर फिरोजपूर येथे त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना फोनवरून सांगण्यात आले.
या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असुन . शुक्रवारी रात्री उशिरा पार्थिवावर गावात अंतिमसंस्कार झाले , त्यांच्या मृत्यू मागील नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई, असे दोनच सदस्य आहेत. विठ्ठल लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले होते. मोठय कष्ठाने त्यांनी नोकरी मिळवुन घर उभे केले होते लग्नाचा मंडप अजुनही दारातच असुन या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली

Leave a Comment