बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला कराळे मास्तरांचा पाठिंबा; मी बच्चूभाऊंच्या सोबत आहे म्हणत सरकारला दिला इशारा

bachhu kadu karale master
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं सांगून सरकार सत्तेत आलं, पण सत्तेत येताच सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे… आज बच्चू कडू (Bachhu Kadu) यांचे जे आंदोलन आहे, ते शेतकरी, कष्टकरी, भूमिहीन, शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी आहे आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी बच्चू कडू यांच्या सोबत उभा आहे असं म्हणत कराळे मास्तर (Karale Master) यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला. आज बच्चू कडू यांच्या मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. यानिमित्ताने कराळे मास्टर यांनी या आंदोलनाला भेट दिली.

यावेळी कराळे मास्तर म्हणाले, राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेला फसवण्याचे काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात मोठमोठ्या घोषणा केल्या कि आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, मात्र अजूनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. उलट उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी एप्रिल अखेर कर्ज भरण्यास सांगितल. म्हणजे तुम्ही नुसत्या घोषणा केल्या, आणि त्या घोषणेवरच मते पदरात पाडून घेतली आणि सत्तेत आलात. पण जर तुम्ही आम्हाला फसवून सत्तेत बसणार असेल तर आम्ही तुम्हाला सुखाने जगून देणार नाही, आणि यासाठी बच्चू कडू आज अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत असं कराळे मास्तरांनी म्हंटल.

शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र दिव्यांगांचे पैसे लाडक्या बहीण योजनेकडे वळवण्याचे काम चालू आहे असा आरोप कराळे मास्तरांनी सरकारवर केला. बच्चू कडू यांचे आंदोलन हे शेतकरी, कष्टकरी, भूमिहीन, शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी आहे आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी बच्चू कडू यांच्या सोबत उभा आहे. जर सरकारने २ दिवसात आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मी सुद्धा वर्धा येथे असच आंदोलन करेन आणि सरकारला जाग्यावर आणेन असा इशारा कराळे मास्तरांनी दिला.

जोपर्यंत आपण आपले मुद्दे मांडणार नाही तोपर्यंत सरकार काहीही देणार नाही . आज बच्चू कडू यांची तब्ब्येत बिघडली, शुगर वाढली, बीपी कमी झाला आहे.. मात्र सरकारचा एकही प्रतिनिधी इकडे बघायला सुद्धा आला नाही हि सरकार साठी लाजिरवाणी गोष्ट आहे. एकेकाळी मंत्री राहिलेल्या माणसाच्या तब्ब्येतीची दाखल सरकार घेत नाही, त्यामुळे खरंच हे सरकार लायकीचे आहे का? असा संतप्त सवाल कराळे गुरुजींनी केला .