Kargil Vijay Diwas: …अन् तेव्हा दिलीपकुमार यांनी नवाज शरीफ यांना झापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजचा दिवस भारतीय लष्कर आणि देशासाठी अभिमानाचा आहे. २१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये तिरंगा फडकवला होता. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १९९९ साली भारताने ऑपरेशन विजय नावाने ही मोहीम राबवली होती. या ऑपरेशनमध्ये लष्कराचे ५३० जवान शहीद झाले. तर सुमारे १३६३ जवान जखमी झाले होते. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेत होते. हे युद्ध दोन महिन्यांपर्यंत चालले होते.

या युद्धादरम्यान एक आगळीवेगळी घटना घडली होती. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना फोन केला होता. त्यावेळी वाजपेयींबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार हे ही होते. वाजपेयींनी शरीफ यांचे दिलीपकुमार यांच्याशी फोनवर बोलणे घडवून आणले होते.

या प्रसंगाचा उल्लेख पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री खुर्शीद कसुरींनी आपल्या ‘नायदर अ हॉक नॉर अ डव’ नावाच्या पुस्तकात केला आहे. त्यात ते म्हणले कि आम्ही लाहोरमध्ये मैत्रीचे आमंत्रण घेऊन आलो होतो. या बदल्यात तुम्ही आम्हाला कारगिल युद्ध दिले, अशा शब्दात वाजपेयींनी फोनवर नाराजी व्यक्त केली होती.

हे ऐकताच नवाज शरीफही नि:शब्द झाले होते. त्यानंतर वाजपेयी म्हणाले, ‘जरा थांबा, एका साहेबांशी तुम्ही बोला.’ वाजपेयी यांनी दिलीपकुमार यांच्याकडे फोन दिला आणि त्यांनी नवाज यांच्याबरोबर फोनवर बोलण्यास सुरूवात केली. ‘मियां नवाज तुम्ही शांतीचे पुरस्कर्ते होता. तुमच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही ही परिस्थिती सुधारा’, असा सल्ला त्यांनी दिला होता. दिलीपकुमार यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे शरीफ यांनाही धक्का बसला होता.

Leave a Comment