व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Karnataka Bank ने सुरु केली नवीन कालावधीची FD, बघा किती मिळतंय व्याज !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Karnataka Bank : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ करण्यात येऊ लागली आहे. याच दरम्यान आता  Karnataka Bank ने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू केले जातील.

Karnataka Bank declares loan over ₹160 cr to Reliance Home, Reliance  Commercial as fraud | Mint

हे जाणून घ्या कि, Karnataka Bank कडून एक वर्षाच्या नवीन कालावधीची एफडी सुरू करण्यात आली आहे. ज्यावर 6.20 टक्के व्याज दिले जाईल. त्याचबरोबर या कालावधीसाठो ज्येष्ठ नागरिकांना 0.40 टक्के अतिरिक्त व्याज देखील दिले जाईल. याचबरोबर बँकेने आणखी एक डिपॉझिट प्लॅन KBL अमृत समृद्धी सुरू केली आहे. हा फक्त 75 आठवड्यांचा डिपॉझिट प्लॅन असेल ज्यावर 6.10 टक्के व्याज दिले जाईल. 15 ऑगस्ट 2022 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

असे असतील एफडीवरील नवीन व्याज दर

हे लक्षात घ्या कि, Karnataka Bank कडून 7-45 दिवसांच्या FD वर 3.40 टक्के व्याज दिले जाईल. तसेच, 46 ते 90 दिवसांच्या FD वर 4.90 टक्के व्याज मिळेल. त्याच बरोबर 91 ते 364 दिवसांच्या FD वर 5 टक्के व्याज मिळेल. यानंतर बँकेकडून नवीन कालावधीसाठी FD सुरु करण्यात आली आहे. या 1 वर्षाच्या कालावधीसाठी बँकेकडून 6.20 टक्के व्याज मिळेल. तर, 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंतच्या FD वर बँक 5.50 टक्के व्याज देईल. तसेच 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंतच्या FD वर ग्राहकांना 5.65 टक्के व्याज दिले जाईल. त्याच प्रमाणे 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.70 टक्के व्याज मिळेल. आता ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक मुदतीच्या FD वर अतिरिक्त 0.40 टक्के व्याज मिळेल.

मुदती आधीच पैसे काढण्यावर द्यावा लागेल दंड

मात्र कालावधी पूर्ण होण्याआधीच जर FD मधून पैसे काढले गेले तर नागरिकांना व्याजदरावर 1 टक्के दंड द्यावा लागेल, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. Karnataka Bank

After banks increased interest rates, RBI has changed fixed deposit rules

ICICI ने देखील व्याजदरात केली वाढ मिळवता येऊ शकेल

याआधी ICICI Bank ने देखील 29 ऑगस्ट रोजी आपल्या 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर आता बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 3.5 टक्के ते 5.90 टक्के दराने व्याज देत आहे. तसेच 1 ते 5 वर्षांच्या FD वर 6.05 टक्के व्याज दर दिला जात आहे. Karnataka Bank

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://karnatakabank.com/personal/term-deposits/interest-rates

हे पण वाचा :

Investment Tips : मजबूत नफा मिळवण्यासाठी श्री गणेशाकडून समजून घ्या गुंतवणुकीच्या ‘या’ 7 टिप्स !!!

आता तिकीट कॅन्सलेशन चार्जवर देखील आकारला जाणार GST, रेल्वे विभागाने म्हटले कि…

Multibagger Stock : गेल्या 19 वर्षांत ‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मोठा रिटर्न !!!

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

Business Idea : पोस्ट ऑफिसद्वारे दरमहा चांगले पैसे कमावण्याची संधी !!!