Wednesday, February 1, 2023

विधिमंडळात राडा! आमदारांनी सभापतींना धरून खुर्चीतून खेचलं खाली

- Advertisement -

बेंगळुरू । कर्नाटक विधानपरिषेदत . (Karnataka Assembly) मंगळवारी गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा पाहायला मिळाला. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना (chairman of the legislative council) अक्षरश: खुर्चीवरून खाली खेचत सभागृहातून बाहेर काढले. अखेर हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागले.

या सर्व गोंधळा मागचे कारण म्हणजे, गोहत्या प्रतिबंधक विधेयक. कर्नाटक सरकारने गायींची रक्षा करणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात मांडले होते. मात्र, या विधेयकामुळे गोरक्षकांना संरक्षण मिळेल, असा विरोधकांचा आक्षेप आहे. गेल्याच आठवड्यात कर्नाटक विधानसभेत गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर झाले होते. त्यावेळी काँग्रेसने सभात्याग करत निषेध नोंदवला होता.

- Advertisement -

‘कर्नाटक मवेशी वध रोकथाम एवं संरक्षण विधेयक-2020’ असे या विधेयकाचे नाव होते. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास कर्नाटकात गोहत्येवर बंदी येईल. तसेच गायींची तस्करी आणि गोहत्येत सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या नियमांचा या विधेयकात अंतर्भाव आहे. हे विधेयक 2010 साली भाजपने आणलेल्या कायद्याचे सुधारित स्वरुप आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’