व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बेळगावात कलम 144 लागू; कर्नाटक सरकारने नाकारली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनास बेळगावात आजपासून सुरुवात होत आहे. या दरम्यान आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मेळाव्यास कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली असून कर्नाटकासह बेळगावात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करतात दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये सामोपचार घडवून आणला. मात्र, यानांतरही कर्नाटक सरकारकडून आडमुठेपणाची भूमिका घेतली जात आहे. महाराष्ट्र कर्नाट्क सरकारकडून एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवण्यात आले असून स्टेज हटवण्यात आले आहे.

काल मेळाव्यास कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता अचानक काम थांबविण्यात आले आहे. बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गाडादी यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मेळाव्यात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. तर काल रात्री स्टेज उभारण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र आज अचानक पोलिसांनी स्टेजचे काम थांबवले असून ही आमची गळचेपी असल्याची असल्याची प्रतिक्रिया महराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी दिली आहे.