हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा सध्या एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कार्तिकने एक मजेदार असे कॅप्शन लिहिले आहे.या अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “चलन कट्टेगा और मेरा भी.”
कार्तिक आर्यनच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून बरीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे, परंतु या व्हिडिओवर अभिनेत्री सारा अली खानची टिप्पणी खूप लक्ष वेधून घेत आहे. इमोजीच्या माध्यमातून कार्तिक आर्यनच्या या व्हिडिओवर साराने भाष्य केले आहे.आजकाल सारा अली खान आणि कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी ‘लव्ह आज काल २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत, हा चित्रपट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रदर्शित होणार आहे.
आणखी बोलायचे झाल्यास, सारा अली खान ‘लव्ह आज काल २’ नंतर ‘कुली नंबर वन’या चित्रपटामध्ये दिसणार आहे.इतकेच नाही तर ती त्यानंतर अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ मध्येही दिसणार आहे.कार्तिक आर्यनचीही जोरदार घोडदौड सुरु आहे तो आता ‘भूलभुलैया 2’ आणि टीसीरीजच्या पुढील अॅक्शन फिल्ममध्ये दिसणार आहेत. अशा प्रकारे, लवकरच दोन्ही स्टार्स आपल्या चाहत्यांना आपल्या दर्जेदार चित्रपटांची मेजवानी द्यायला तयार आहेत.