…तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही? ; पूजा चव्हाण प्रकरणात करुणा धनंजय मुंडेंची उडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर रंज्यातील विरोधी पक्षांनी ठाकरे सरकार वर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान करुणा धनंजय मुंडे ( करुणा शर्मा ) यांनी यात उडी घेतली एका फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी ठाकरे सरकार वर टीका केली.

“जे दिशा बरोबर झाले आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही?”, असा खणखणीत सवाल करुणा शर्मा यांनी फेसबुकवर केला आहे. “आम्ही न्याय मागतो, भीक नाही. पूजा चव्हाण यांची आत्महत्या की हत्या याची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे”, असंदेखील करुणा शर्मा म्हणाल्या आहेत

पूजा चव्हाण प्रकरण नेमकं काय?

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. या क्लिपमधील आवाज शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

You might also like