कसबा गणपतीचे यंदा ई वेस्ट कलेक्शन ड्राइव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | श्री कसबा गणपती सार्वजणीक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी स्तुत्यजन्य उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र प्रदुषण बोर्ड आणि कसबा गणेश मंडळ यांनी संयक्तपणे ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह करण्याचे ठरवले आहे. सध्या ई वेस्ट मुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. यापार्श्वभूमीवर कसबा गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे पुणेकरांमधे स्वागत केले जात आहे.

सदर ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह कसबा गणेश मंडळामधे गणेशोत्सवादरम्यान राबवला जाणार आहे. खराब झालेली इलेक्ट्रिकल उपकरणे या वेळी मंडळा कडून गोळा करण्याचे काम केले जाईल असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. यामधे प्रामुख्याने मोबाईल फोन, लेपटोप, रिमोट, टि.व्ही. आदी वस्तूंचा समावेश असणार आहे. गोळा झालेले ई वेस्ट महाराष्ट्र प्रदुषण बोर्डाकडे पुढील विघटनाच्या प्रक्रीयेकरता देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगीतले आहे.

Leave a Comment