कसबा पेठ, पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी 27 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार असून त्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होईल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.

या निवडणूकीसाठीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 8 फेब्रुवारी अर्जांची छाननी तर 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल  मार्च रोजी जाहीर होणार आहे.