..म्हणून कतरिनाने अक्षयला चक्क झाडूने बदडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रोहित शेट्टीचा सिनेमा सेटवर धमाल-मस्ती होणार नाही? हे एक समीकरण बनलं आहे. ‘सूर्यवंशी’ या रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमात अक्षय कुमार आणि कतरीना कैफ पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या सिनेमाचं सध्या चित्रीकरण सध्या सुरु आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान, रोज काही न काही धमाल गोष्टी घडत असल्याच्या प्रसार माध्यमांत येत आहेत. असाच काहीसा धमाल घटनेचा व्हिडिओ अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्रामवरून शेयर केला आहे. सध्या हा व्हिडीओ अक्षयने शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत कतरीना अक्षयला चक्क झाडूने मारताना दिसत आहे. अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कतरिना सेटवर झाडून काढत आहे. तिला सेटवर काम करताना पाहून अक्षयनेही तिची खिल्ली उडवत लगेच तिचा व्हिडीओ काढायला सुरुवात केली. व्हिडिओ दरम्यान अक्षय प्रश्न विचारुन कतरीनाला मुद्दाम त्रास देतांना दिसत आहे. त्यावर कतरीना चिडून अक्षयला मस्तीने झाडू मारते.

अक्षय आणि कतरीनाची ऑनस्क्रीन केमेस्ट्रीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. हमको दिवाना कर गये, नमस्ते लंडन, वेलकम, सिंग इज किंग या सिनेमातून या जोडीनं प्रेक्षकांची मने जिंकली. आता पुन्हा एकदा ‘सूर्यवंशी’ या सिनेमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट येत्या २७ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय आणि कतरिनासोबत जॅकी श्रॉफदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत.


View this post on Instagram

 

Spotted : The newest #SwachhBharat brand ambassador on the sets of #Sooryavanshi ???? @katrinakaif #BTS

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on Feb 3, 2020 at 2:13am PST

 

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment