केरळ सोने लूट : साताऱ्यातून 25 लाखाची गोल्ड टेस्टिंग मशिन पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | केरळ राज्यातून लुटलेले साडेसात किलो सोने वितळावलेल्या येथील सदाशिव पेठेतील ‘ज्योतिर्लिंग बुलियन रिफायनरी ॲण्ड गोल्ड टेस्टिंग’मधील(जेबीएल) 25 लाख रुपयांची ‘गोल्ड टेस्टिंग मशिन’ केरळ पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सुजित जगताप याच्या मालकीची ही रिफायनरी असून, तो पसार झाला असल्याची माहिती केरळ पोलिसांनी दिली.

पलक्कड येथील ‘मारुथा सोसायटी’वर दरोडा टाकून तीन कोटींहून अधिक रुपयांचे साडेसात किलो सोने लुटल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी संशयित म्हणून परेश अशोक अंबुर्ले ऊर्फ निखिल जोशी याला अटक केली. पोलिस तपासामध्ये सोने सातारा जिल्ह्यातील सराफांकडे वितळविल्याचे समोर आले. संशयित राहुल घाडगे स्वत: हून केरळ पोलिसांसमोर शरण आला होता.

केरळ पोलिस त्याच्याकडून कसून तपास करत असतानाच त्याने या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे, सोने कोणत्या रिफायनरीत वितळविले, तसेच डॉ. नीलेश साबळे कुठे आहे. त्याच्या गाड्या कुठे लावल्या आहेत, याची सर्व माहिती दिली होती. त्यामुळे केरळ पोलिस पुन्हा साताऱ्यात आले होते. जवळपास 20 हून अधिक पोलिसांची टीम ‘मारुथा सोसायटी’ दरोडा प्रकरणाची नव्या दमाने चौकशी करत आहेत. डॉ. नीलेश साबळे याची आणखी एक चारचाकी रविवारी दुपारी केरळ पोलिसांनी जप्त केली आहे.

साताऱ्यातील भुसे गल्लीतील जेबीएल फर्म सुजित जगताप याच्या मालकीची असून, त्याचीही झडती केरळ पोलिसांनी घेतली. केरळ पोलिसांच्या टीमचा सातारा मुक्काम काही दिवस वाढलेला आहे.

Leave a Comment