केरळमधील तळीरामांना दिलासा; डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळणार दारू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्रानं संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व वस्तूंची दुकानं ही बंद राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच कोंडी झाली. सगळीकडं दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात विविध भागात मद्यपींच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी ज्यांच्याकडं डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल अशा मद्यपींना दारू विक्री करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजयन यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. दारूचं व्यसन जडलेल्यांना तळीरामांना या निर्णयामुळं आता दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर दारूच्या आहारी गेलेल्यांना मोफत उपचार करण्यात यावे असंही मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटलं आहे.

इतकंच नव्हे तर दारूच्या टंचाईमुळे काही नवीन सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकार ऑनलाईन दारू विक्रीच्या पर्यायाचा विचार सुद्धा करत आहे, असंही विजयन यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांत केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे तपासायला
येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment