Wednesday, October 5, 2022

Buy now

‘या’ मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? ‘शाळा’ चित्रपटात केलं होतं काम; फोटो पाहून व्हाल घायाळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन अनेकदा तुम्हाला काही कलाकार खूप आवडतात. (Ketaki Mategaonkar) तुम्ही अगदी त्यांच्या प्रेमातही पडता. मात्र कालांतराने हळू हळू तुम्ही त्यांना विसरता. कधी कधी चित्रपटांतील बालकलाकारांमध्ये इतका बदल होतो कि त्यांना ओळखणेही कठीण जाते. अन जेव्हा अचानक त्या कलाकारांचा फोटो खूप दिवसांनी तुमच्यासमोर येतो तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. अशीच गोष्ट घडलीय शाळा या २०११ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील एका अभिनेत्रींसोबत.

https://www.instagram.com/p/CcmZqCZqMmG/?utm_source=ig_web_copy_link

शाळा चित्रपटातील शिरोडकर तेव्हा खूपच लोकप्रिय झाली. केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिने शाळा चित्रपटात शिरोडकर नावाचं पात्र साकारलं होतं. त्यानंतर केतली काही दोन चार चित्रपटांत दिसली. मात्र ते चित्रपट काही खास चर्चेत आले नाहीत. त्यामुळे केतकी अनेकांना खूप दिवस झाले दिसली नाही. पण सध्या ती पुन्हा जोरदार चर्चेत आली आहे. केतकीने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर तिचे चाहते अक्षरशः घायाळ झालेले आहेत.

https://www.instagram.com/p/CcDf5q9N0Ah/?utm_source=ig_web_copy_link

पिवळ्या रंगाचा स्लिव्हलेस टीशर्ट घालून गॉगल ओठांमध्ये धरलेल्या तिच्या पोजवर नेटकरी फिदा झालेत. या फोटोत केतकी एका विंटेज स्कुटरवर बसलेली दिसत आहे. तिच्या फोटोतील अदांमुळे तिचे चाहते पुरते घायाळ झालेत. अनेकांनी तिच्या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तर काहींनी तू इतके दिवस कुठे होतीस असंही विचारलं आहे.

https://www.instagram.com/p/CUuDIBUtrFl/?utm_source=ig_web_copy_link

शाळा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. शाळा चित्रपटाने तेव्हा अनेकांना वेडं केलं. शाळा पाहून अनेकांना त्यांच्या रिअल लाईफमधील शिरोडकर आठवली अन प्रत्येकाने जोश्यामध्ये स्वतःला पाहून जुन्या दिवसांना पुन्हा जगून घेतलं. आता चित्रपट येऊन दहा वर्ष उलटून गेलीयेत मात्र तरी शाळेतली शिरोडकर कधी मिम्समध्ये तर कधी एखाद्याच्या स्वप्नात येऊन चाहत्यांमध्ये अजूनही लोकप्रियता टिकवून आहे.

https://www.instagram.com/p/CP_ETH9jwWR/?utm_source=ig_web_copy_link

ती सध्या काय करते?

आपली आवडती व्यक्ती जेव्हा अनेक दिवसांनी आपल्याला आठवते तेव्हा आपल्याला पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे ती सध्या काय करते?. केतकिबाबातही (Ketaki Mategaonkar) तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच असणारे. केतकी तिच्या बालपणापासून संगीतात रमत आली आहे. नंतर तिने काही मराठी चित्रपटांमध्ये कामही केलं. मात्र ती पूर्णवेळ काय करते असा प्रश्न विचारलं तर ती पूर्णवेळ तिची गायनाची आवड जोपासते असे दिसते. शास्त्रीय गायनामध्ये केतकीने प्राविण्य मिळवलं असून ती त्यातच करिअर करत आहे.

https://www.instagram.com/p/COXf4O3D6AS/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/B75uOGKjl1s/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CBhuWBMDUIw/?utm_source=ig_web_copy_link