व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अखेर केतकी चितळेला अटक ; शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट टाकणे भोवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील आज सकाळी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या प्रकरणी तिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या अटकेची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे अखेर ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले असून असून तिला अटकही केली आहे.

मराठीतील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे हिने आज तिच्या फेसबुक अकाउंटवरुन शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, तिला अटक करण्यात आली न्हवती. मात्र, ठाणे पोलिसांनी नुकतीच तिच्यावर कारवाई करीत तिला ताब्यात घेतले आहे. केतकीच्या फेसबुक पोस्टनंतर तिच्या विरोधात स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला होता.

केतकी चितळेची नेमकी फेसबुक पोस्ट?

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. केतकीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले की, तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll, ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक, सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll, समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll, ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll, भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll, खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll, याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll असा ओळी केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत