KGF Chapter 2 | केजीएफ साम्राज्याचा सम्राट बनलेल्या रॉकी भाईचा जलवा ; तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  भारतीय चित्रपट विश्वात २०१८ साली धुमाकूळ घातलेल्या KGF Chapter 1 चित्रपटाचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य सुपरस्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांना खुश करून सोडलं असून या चित्रपटाचा तिसरा भागही येणार असल्याचं चित्रपटाच्या पूर्वार्धात पहायला मिळालं.

कोलार गोल्ड फॅक्टरी हे चित्रपटाचं नाव चित्रपटाच्या कथानकाला साजेसं असं आहे. कर्नाटक राज्यातील कोलार येथे असलेल्या सोन्याच्या खाणींची आणि तिथल्या साम्राज्याची कहाणी ही चित्रपटाची मूळ संकल्पना आहे. पहिल्या भागात या कोलार साम्राज्याचा सर्वेसर्वा असलेल्या गरुडाला मारून रॉकीभाई म्हणजेच यशने आता कोलारवर आपण लक्ष देणार असं सूचित केलं होतं. मुंबईतल्या एका चाळीतील मुलगा ते भल्या-भल्या गुंडांना बेजार करून ठेवणारा विश्वासू सेनापती अशी रॉकीभाईची प्रतिमा केजीएफच्या पहिल्या भागात लोकांनी अनुभवली होती.

दुसऱ्या भागात ही प्रतिमा आणखी डॅशिंग, बेदरकार आणि रंजक दाखवली आहे. एका आईच्या स्वप्नांची पूर्तता करणाऱ्या जिद्दी मुलाची कहाणी म्हणजे केजीएफ असं एका अर्थाने म्हणता येईल. कोलारमधेच असणाऱ्या इतर ९ खाणींची माहिती रॉकी भाई शोधून काढतो. कोलार खाण मिळाल्यानंतर रॉकीला हुसकावून लावू अशी स्वप्नं बघणाऱ्या मालक लोकांना रॉकीने त्यांची जागा दाखवून दिली. याशिवाय खाणीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सन्मानाचं जगणं देत रॉकीने केजीएफ साम्राज्याचा विस्तार कसा केला हे समजण्यासाठी केजीएफ पाहायलाच हवा. केजीएफ उभारताना आणि ते उभारल्यानंतर तयार झालेल्या शत्रूंचा सामना करताना रॉकीभाईचा परफॉर्मन्स हा लक्षात राहण्यासारखा आहे.

अलीकडच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांत दिसणारी भव्य-दिव्यता या चित्रपटातही दिसून येते. संजय दत्त यांनी खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

Leave a Comment