खडसेंची पत्रकार परिषद रद्द; प्रकृती खालावल्याचं दिलं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून त्यांना याप्रकरणी ईडीकडून समन्स देण्यात आला आहे.  दरम्यान त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनाही ईडीने कारवाई करीत अटक केली. समन्स दिल्यानंतर ईडीपुढे उपस्थित राहण्यापूर्वी खडसेंनी पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.

भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ‘ईडी’कडून देण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

खडसेंच्या चौकशीसाठी अजून एक तास शिल्लक आहे. त्यामुळे खडसे या चौकशीसाठी हजर राहतील का? याबाबत सध्या चर्चा केली जात आहे. यापूर्वीही खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे. पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या भूखंडाची खडसे यांनी २०१६ मध्ये गिरीश चौधरी यांच्या नावे ३.७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. त्यामुळे या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय ‘ईडी’कडून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment